अभिषेक बच्चनने केलं हृषिकेश जोशीच्या ‘नेटक’ या माध्यमाचं अनावरण

By  
on  

काही दिवसांपुर्वी  स्पृहा जोशीने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये प्रोमो व्हिडीओ होता आणि त्यात ‘शुभारंभाचा प्रयोग’ असं लिहिण्यात आलं होतं. पण हा व्हिडियो ‘नेटक’ या माध्यमाचा आहे. अभिनेता हृषिकेश जोशी याच्या दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले ‘नेटक’ म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’ 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

विशेष म्हणजे नेटक या माध्यमाचं अनावरण अभिषेक बच्चन याच्या हाती झालं आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकतीच याबाबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘"रंगभूमीचे कलावंतही वर्क फ्रॉम होम करू शकतात"....आणि इच्छा असली की नवीन कामाला मोठ्यांचेही हात लागतात. अभिषेक बच्चन यांनी काल आमच्या नेटक या माध्यमाचे राष्ट्रीय स्तरावर अनावरण केले. हा मोगरा फुलू दे, बहरू दे...’ आता नाटकाच्या या नवीन माध्यमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्येही असेल यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share