मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ‘देऊळ बंद’ हा सिनेमा सर्वांच्याच मनात घर करुन गेला.हा सिनेमा अक्कलकोटचे ‘श्री स्वामी समर्थ’ महाराज यांच्या भक्तीवर आधारित होता.या सिनेमाने प्रवीण तरडे यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांचा यशस्वी घौडदौड सुरुच झाली.. या सिनेमाने खुप मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. त्यांना या सिनेमाचा पुढचा भाग यावा अशी तीव्र इच्छा होती आणि आता इच्छ लवकरच पूर्ण होईल असं दिसतंय.
यंदाच्या गुरुपोर्णिमेचा मुहूर्त साधत प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाची घोषणा केली. ५ जुलै रोजी गुरु पोर्णिमेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ही आनंदवार्ता सर्वांना सांगितली. प्रविण तरडे म्हणतात, “आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ‘देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची’ या नव्या चित्रपटाला सुरुवात करतोय आणि पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, असं चित्रपटाच्या निर्मात्या जुईली वाणी- परदेशी यांनी सांगितलं.तसंच ‘गेल्यावेळी स्वामींना शास्त्रज्ञ भेटले होते…यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे. हा सिनेमाही हिट होईल,’ असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ -
. २०१५ साली प्रदर्शित झालेला ‘देऊळ बंद’ या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका साकारली होती.