आता पुन्हा एकदा गॅरीच्या पुढे-मागे लटक्या रागात आणि लाडात फिरणारी तिच पूर्वीची शनाया तुमच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच रसिका सुनिल ही पुन्हा माझ्या नव-याची बायको मालिकेत घरवापसी करतेय. आरोग्याच्या काही तक्रारींमुळे सध्या शनाया साकारणारी अभिनेत्री इशा केसकरने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या शनायाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत असतानाच आता पुन्हा एकदा त्याच ढंगात जुनी शनाया परत येतेय, म्हणून प्रेक्षक उत्सुकही झाले आहेत. 'माझ्या नव-याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवते आहे. राधिका, गुरू आणि शनाया या प्रेमत्रिकोणाच्या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत युवा पिढीचं नेतृत्व करणारी आणि बेधुंद व मनोसक्त वागणारी शनाया नेहमीचं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते.
गुरूची गर्लफ्रेंडच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेला अभिनेत्री रसिका सुनीलने पुरेपूर न्याय दिला आहे. भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी पडद्यावर ती तंतोतंत साकारल्याने रसिकाला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळालीय