करोना संकटामुळे जवळपास दोन ते तीन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याची परवानगी दिली. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. पण घराबाहेर पडायचंय पण योग्य ती खबरदारी घेऊनच.
घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेऊन आता घरातून बाहेर पडायलाच हवं असं तुमची लाडकी मालिका होणार सून मी ह्या घरचीच्या श्रीच्या सहा आई आणि श्री सांगतोय. ही मालिका संपून आता अनेक वर्ष उलटली तरी त्यांचा एक खास चाहता वर्ग आहे.
अभिनेत्री लीना भागवत यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून हा व्हिडीओ साकार झाला आहे. प्रत्येकाने आपापल्या घरुनच याचं चित्रिकरण केल्याचं पाहायला मिळतंय,