ही अभिनेत्री शिकतीये नवीन कला, शेअर केला व्हिडियो

By  
on  

'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे लॉकडाऊनमध्ये घरी होती. पण या दरम्यान ती OMT  या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. या माध्यमासाठी ऋतुजा माईमिंग शिकली होती. माईमिंग म्हणजे मुकपट. हा सादर करण्यासाठी ऋतुजा हा कलाप्रकार शिकली आहे. यासाठी मदत करणा‌-यांचेही तिने आभार मानले आहेत. ऋतुजाला हा प्रकार शिकण्यासाठी जवळपास एक आठवड्याचा कालावधी लागला. 

 

 

ऋतुजाच्या या व्हिडियोवर चाहतेही लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत. 'अनन्या' नाटकातील अतुलनीय अभिनयासाठी आजवर तिचा अनेक प्रतिष्ठीत  पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. आता या नाटकावर बेतलेला सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share