काळ कोणताही असो स्त्रियांनी स्वत:ची योग्यता कायमच सिद्ध केली आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन जबाबदारी येऊनही तिने स्वत्व जपलं आहे. स्वत:ची ओळख बनवली. पहिली महिला स्त्री डॉक्टर होण्याचा मान मिळवलेल्या आनंदी बाई जोशीदेखील यातल्याच.
आनंदीबाईंच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी झी टॉकीजने ‘आनंदी गोपाळ’ नावाचा बायोपिक रसिकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘रंग माळियेला’ अशी सुरुवात असलेलं हे गाणं केतकी माटेगावकर आणि शरयू दाते यांनी गायलं आहे. हृषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी या गाण्यावर स्वरसाज चढवला आहे. या गाण्यात आनंदी आणि गोपाळरावांच्या विवाह सोहळयाचे क्षण आहेत. सहा सात वर्षांच्या आनंदीचा वयाने दुपटीहून मोठे असलेल्या गोपाळरावांशी होत असलेला विवाह पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही. या गाण्यात आनंदीने शिकावं म्हणून गोपाळरावांचा हट्ट देखील दिसून येतो. या गाण्यातून त्याकाळातील एकंदरीत परिस्थितीचं अचूक वर्णन आहे.
https://www.youtube.com/watch?v=nP6AkuMMzaI