स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणून त्यांना शिक्षित करण्याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. सावित्रीबाई या पहिल्या स्त्री शिक्षिका ओळखल्या जातात. समाजाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंसोबत शिक्षणाचा वसा जपला.
सावित्रीबाईंच्या याच कार्याला सलाम करत तेजस नेरुरकरने २०१९ कॅलेंडरमध्ये त्यांना अभिवादन केलं आहे. सावित्रीबाईंच्या लूकमध्ये दिसणार आहे अभिनेत्री सई ताम्हणकर.
सावित्रीबाई फुले यांच्या गेट अपमधील सईचा लूक नुकताच व्हायरल झाला आहे. सई या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. जानेवारीमध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती असते त्याचं औचित्य साधून तेजसने हा फोटो पोस्ट केला आहे.
https://www.instagram.com/p/BsxLYE-njfG/?utm_source=ig_web_copy_link