By  
on  

अभिनेत्री प्रितम कागने हिचा नवा लूक पाहिलात का? या सिनेमात दिसणार पोलिस अधिका-याच्या रुपात

हलाल, संघर्षयात्रा आणि ३१ ऑक्टोबर या सिनेमांमधून नावारुपास आलेल्या अभिनेत्री प्रितम कागने ने अल्पवधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रितम आता अहिल्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रितमने तिच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून नुकतंच या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. राजू पारसेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अहिल्या एका महिला पोलिसा अधिका-याच्या भूमिकेत आहे.

या सिनेमात अहिल्याच्या आयपीएस ऑफिसर बनण्यापर्यंतच्या स्वप्नांचा प्रवास दाखवला जाणार आहे. पडद्यावर पोलिस अधिकारी साकारताना फिजिकल फिटनेस अत्यंत गरजेचा असतो. त्यामुळेच उत्तम पोलिस अधिकारी वठवण्यासाठी प्रितमने अत्यंत मेहनत घेतली आहे. रायफल चालवण्यापासून ते सायकलिंग, कराटे, स्विमिंग हे व्यायाम प्रकारही केले. श्रीधर चारी, अमृता देवधर आणि अनघा खेर या सिनेमाचे निर्माता आहेत. या सिनेमाचं पोस्टर उत्सुकता वाढवणारं असल्याने चाहते सिनेमा रिलीज व्हायची वाट पाहात आहे यात शंका नाही

https://www.instagram.com/p/BsxI-4ehNkW/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive