हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील सिनेमा ‘ठाकरे’ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. येत्या २५ तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा एक बाब प्रत्येकालाच खटकली होती ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज. या सिनेमात आधी बाळासाहेबांसाठी सचिन खेडेकरांनी आवाज दिला होता. पण बाळासाहेबांच्या आवाजाचा फील त्यात न आल्याने रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांचाच आवाज वापरला जावा अशी प्रत्येकाचीच इच्छा होती. त्यामुळे बाळासाहेंबाचा हुबेहूब आवाज काढणारे चेतन सशितल हे बाळासाहेबांचा आवाज बनावेत अशी मागणीही चाहत्यांनी केली होती. निर्मात्यांनी या मागणीचा विचार करून बाळासाहेबांच्या करारी आवाजातील ट्रेलर रिलीज केला आहे. यात बाळासाहेबांच्या आवाजाची जादू पुन्हा अनुभवायला येत आहे.
विशेष म्हणजे या हिंदी भाषेतील सिनेमात नवाजुद्दीनचाच आवाज बाळासाहेबांसाठी वापरला गेला आहे. पण नवाजनेही बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आवाज येण्यासाठी चेतन यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. या संदर्भातील एक फोटोही त्यावेळी चेतन यांनी अपलोड केला होता. पण ठाकरे मराठी सिनेमासाठी चेतन यांचाच आवाज वापरला असल्याने वाघाच्या डरकाळी मागचा चेहरा स्पष्ट झाला आहे.
https://www.instagram.com/p/Bogqet8AEAi/?utm_source=ig_web_copy_link
‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाची टीम ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम करेल. संजय राऊत यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना तब्बल चार वर्षे लागली. अभिजीत पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. येत्या २५ जानेवारी २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=INOTrg-wQgE