अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त अभिनेता सुबोध भावेने पत्नी मंजिरीला या अंदाजात केलं विश

By  
on  

अभिनेता सुबोध भावे आणि मंजिरी भावे लग्नाचा 19वा वाढदिवस साजरा करत आहेत. असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. सुबोध भावेकडे पाहता त्याची प्रचिती नक्कीच येते. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात मंजिरीने सुबोधला खंबीर साथ दिली आहे.
आज त्याने मंजिरीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने एक हटके फोटो शेअर केला आहे.

 

 

पहिल्या फोटोमध्ये लग्नवेदीवरील सुबोध-मंजिरी आहेत. त्यांच्यामध्ये आंतरपाट धरला आहे. तर दुस-या फोटोत या दोघांचेही मास्क आहे आणि मध्ये छोटा पाट आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुबोध म्हणतो,

‘मंजिरी-सुबोध

आंतरपाट १२ जुलै २००१ ते
आंतरपाट १२ जुलै २०२०
नात्याचा १९ वर्षांचा प्रवास.’ 
या दोघांना सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, सुयश टिळक, श्रुती मराठे, प्रिया मराठे, सुरुची आडारकर यांनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share