पुष्कर जोगने वाढदिवशी केला मुंबई पोलिसांना असा अनोखा सलाम

By  
on  

करोना संकटात प्रत्येकाला घरीच राहून या अस्मानी संकटावर मात करायची आहे. सरकारी यंत्रणां, डॉक्टर्स यांच्यासोबतच मुंबई पोलिससुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत. तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची, त्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

हीच कृतज्ञता अभिनेता पुष्कर जोगने आज आपल्या वाढदिवसादिवशी दाखवली आहे. पुष्कर सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हणतो, "आपण सर्वजण आपापला वाढदिवस नेहमी अनोख्या मार्गाने साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतोच .मी ही आज माझ्या वाढदिवसा निमित्त आपल्या साठी अहोरात्र झटणारे मुंबई पोलिस.या कोरोना काळात तर त्यांचे कष्ट अपरिमीत आहेत . मी आज सह पोलिस कमिशनर यांची भेट घेतली व मुंबई पोलिसां प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि पोलिस कर्मचारी फंडासाठी धनादेश सुपूर्त केला ..."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपण सर्वजण आपापला वाढदिवस नेहमी अनोख्या मार्गाने साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतोच .मी ही आज माझ्या वाढदिवसा निमित्त आपल्या साठी अहोरात्र झटणारे मुंबई पोलिस.या कोरोना काळात तर त्यांचे कष्ट अपरिमीत आहेत . मी आज सह पोलिस कमिशनर यांची भेट घेतली व मुंबई पोलिसां प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि पोलिस कर्मचारी फंडासाठी धनादेश सुपूर्त केला ... If anybody asked me what I want to be ? I would answer “ I want to be a good citizen of my country & a good human being “ I dedicate my birthday today to all my covid warriors . Doctors , nurse , workers , news reporters Maharashtra police , Mumbai police . I just did my bit & I urge everybody to do so . @mumbaipolice @anildeshmukhncp #maharastrapolice #pushkarjog #happybirthday #birthday #mumbai #mumbaipolice #covid19 #covidwarriors #coronavirus #gocorona #instagood #instagram

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar) on

 

पुष्करवर या अनोख्या कार्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच अभिनंदनाचा वर्षावही होतोय.  

Recommended

Loading...
Share