कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या कार्यक्रमाचा अॅंकर मकरंद अनासपुरे आपल्या इरसाल प्रश्नांनी या पाहुण्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमात यावेळी अत्यंत खास पाहुणे आले आहेत.
ठाकरे सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत ‘अस्सल पाहुणे आणि इरसाल नमुने’च्या सेटवर आले होते. यावेळी नवाजने त्याच्या अनेक आठवणी प्रेक्षकांशी शेअर केल्या आहेत.
सिनेसृष्टीत ओळख बनवण्यासाठी नवाजने जवळपास १२ वर्ष संघर्ष केला. यावेळी त्याला अनेकदा अर्धपोटी रहावं लागलं तसेच धीर खचेल अशा अनेक प्रसंगांनाही सामोरं जावं लागल्याचं त्याने सांगितलं.
नवाजसोबत संजय राऊत यांनी देखील राजकीय करीअरमधील आठवणी शेअर केल्या तसेच बाळासाहेबांच्या आठवणीही सांगितल्या. या दोघांच्या अनुभवांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी २५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वा. अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा धमाकेदार भाग नक्की पाहा.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1087657788388438017