By  
on  

सोनालीने दुबईमध्ये थापल्या भाक-या, म्हणते ‘हे शिक्षण चटके देणारं तरी सुखाचं’

सोनाली सध्या दुबईमध्ये फियॉन्से कुणालसोबत आहे. दुबईमध्ये असताना घरातील सर्व कामांचा सरावही सोनाली करताना दिसते आहे. सोनालीला अलीकडेच तेथील सुपरमार्केटमध्ये भाकरीचं पीठ मिळालं होतं.त्यानंतर सोनालीने भाकरी करतानाचा एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती एका गावातील घरात भाकरी करत होती तर याच व्हिडियोमध्ये ती दुबईमधील घरी भाकरी करताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आधी हाताला चटके तवा इंडक्शन वर भाकर .... रायगडावरच्या एका छोट्याशा झोपडीत चुलीवर भाकरी थापायला शिकले... “हिरकणी" साठीच्या training चा एक भाग म्हणून..... आता दुबईतल्या एका tower मधे तोच अनुभव कामी येतोय... कुठल्याही वयातलं कसलंही शिक्षण हे थोडे चटके देणारं असलं तरी सुखाची भाकर देणारंही असतंच...!!! #throwback #video #Hirkani #mondaymotivation #alwaysastudent #keeplearning #keepgrowing #teamwork

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, ‘आधी हाताला चटके तवा इंडक्शन वर भाकर .... रायगडावरच्या एका छोट्याशा झोपडीत चुलीवर भाकरी थापायला शिकले... “हिरकणी" साठीच्या training चा एक भाग म्हणून..... आता दुबईतल्या एका tower मधे तोच अनुभव कामी येतोय... कुठल्याही वयातलं कसलंही शिक्षण हे थोडे चटके देणारं असलं तरी सुखाची भाकर देणारंही असतंच...!!!’  तिच्या या प्रयत्नांचं चाहतेही चांगलच कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडियोमध्ये तिच्यासोबत कुणालही स्वयंपाक करताना दिसतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive