By  
on  

इशा केसकर चाहत्यांना विचारते, 'सगळं पुन्हा आधी सारखं होईल का?'

आधी साधी-भोळी बानूबया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि त्यानंतर नटखट अंदाजात हॉट आणि बोल्ड अवतारात शनाया म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री इशा केसकरने मालिकाविश्वात अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं. आता लॉकडाऊननंतर पुन्हा सर्व मालिकांचा श्रीगणेश झाला, पण त्या दरम्यानच एक आश्चर्यचकित करणारी बातमी मिळाली ती म्हणजे इशाने माझ्या नव-याची बायको मालिकेला राम राम ठोकला. नवी शनाया म्हणून इशा प्रेक्षकांना खुप आवडली होती, पण तिने आपल्या आरोग्याचं कारण देत ही मालिका सोडल्याचं सांगितलं. 

शनाया साकारताना इशाने आपले केस निळसर रंगात रंगवल्याचं पाहायला मिळालं, तिच्या या लुकची बरीच चर्चाही झाली आणि थट्टासुध्दा. पण आता पुन्हा एकदा इशाने आपले केस पूर्ववत करावे का असा चाहत्यांना सवाल केला आहे. इशा म्हणते, केसांचा रंग पुन्हा पुर्वीचा केला/ बददला तर सगळं पुन्हा आधी सारखं होईल का?
.

 

इशाने अल्पावधितच नवी शनाया म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.तिची स्टाईल रसिकांना खुप आवडली.  .इशा केसकरला तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive