By  
on  

Video : अपू्र्वा नेमळेकरची ही भन्नाट टिकटॉक शिकवणी पाहा

शेवंता म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या भन्नाट व्हिडीओंमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा भलतीच लोकप्रिय ठरतेय, लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी ट्रीट देण्याचा प्रयत्न कलाकार मंडळी करतायत. अनेकांनी त्यांसाठी सोशल मिडीया अकाऊंटचा आधार घेतलाय. आपले यूट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. शेवंताचंही तसंच आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी संपर्क साधते. आता अपूर्वानेही तिचं युट्यूब चॅनेल सुरु केलंय आणि एका नव्या व्हिडीओत नुकतंच तिने चक्क टिकटॉकची शिकवणीच दिलीय एका आजीबाईंना. या आजीबाई म्हणजे पण अपूर्वाच आहे आणि सॉफ्टी कोमल पण अपूर्वाच आहेत. टिकटॉकचे व्हिडीओ कसे तयार करायचे हे शिकवण्यासाठी आजीबाई सॉफ्टी कोमलच्या मागे लागतायत. मग काय धम्माल उडते, ते व्हिडीओत पाहा. 

अपूर्वाचा हा टिकटॉक शिकवणी स्पेशल व्हिडीओ पाहून तुमचीही हसून हसून पुरेवाट लागेल यात शंका नाही.  

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive