By  
on  

सोनाली कुलकर्णीला सुचत नाहीये कॅप्शन चाहत्यांना म्हणते काही caption सुचतंय का बघा !?!?!?

लॉकडाऊनचा काळ आपण सर्वच तीन महिन्यांच्यावर घरी आहोत. सेलिब्रिटींचीसुध्दा सामान्यांसारखीच अवस्था आहे. आता घरी बसून, आराम करुन, घरकामं आवरुन आणि विविध छंद जोपासून कंटाळा यायला लागला आहे . प्रत्येकालाच बाहेर पडावसं वाटत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील तुमच्या-आमच्या प्रमाणेच या लॉकडाऊनला कंटाळली आहे. सोनालीने एक छोटी चारोळी पोस्ट केली आहे. 

 

 

‘काही कळेना...वेळ जाईना......लॉकडाउन संपेना... म्हटलं तुम्हालाच विचारते,
काही caption सुचतंय का बघा !?!?!?

या चारोळीसोबतच सोनालीने एक गोड फोटोही पोस्ट केला आहे. सोनाली सध्या दुबईमध्ये फियॉन्सेसोबत आहे. सोनालीच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरु केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive