By  
on  

सोनाली म्हणते, ‘ल्युडो, कॅरम सगळ्याचा कंटाळा आला चला आता हा खेळ खेळू’

आपण सर्वजण तीन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊनमध्ये आहोत. त्यामुळे सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी केलेल्या कृतींचा आता प्रत्येकाला कंटाळा येऊ लागला आहे. एरवी रोजच्या रुटीनला कंटाळणारे आपण आता टाईमपासला ही कंटाळलो आहोत. 

 

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचंही असंच झालं आहे. सध्या दुबईमध्ये असलेली ही हिरकणी आता या लॉकडाऊनला चांगलीच कंटाळली आहे. सोनालीने काल ‘काही कळेना...वेळ जाईना......लॉकडाउन संपेना... म्हटलं तुम्हालाच विचारते,
काही caption सुचतंय का बघा !?!?!? ही चारोळी पोस्ट करत चाहत्यांना प्रश्न विचारला होता. आता तिने फोटो पोस्ट करत कॅप्शन कॅप्शन खेळूया का असं चाहत्यांना विचारलं आहे. 
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, ‘#ludo #carrom सगळ्याचा कंटाळा आला आता ️ चला #caption कॅप्शन खेळूया, काय म्हणतेय मी’. सोनालीच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कमेंट्समध्ये आपल्या भन्नाट कॅप्शन्सचा वर्षाव सुरु केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive