By  
on  

या कारणासाठी रणजितची संजीवनी पाहतेय तिकडे, जाणून घ्या

करोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास तीन महीने सर्वकाही ठप्प झाले होते.पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. 

रंजीत आणि संजीवनीची अफलातून केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप भावते. त्यामुळे नुकत्याच सुरु झालेल्या नव्या एपिसोड्सची प्रेक्षकांमध्ये खुप उत्सुकता आहे. पण नुकतंच संजीवनी साकारणा-या शिवानी सोनाच्या एका फोटोची चांगलीच चर्चा सोशल मिडीयावर रंगली  आहे. शिवानीने या फोटोला भन्नाट कॅप्शन देत सोशल मिडीयावर हास्याची कारंजी उडवलीय...या हिरव्या गर्द साडीतील सुरेख फोटोला शिवानीने....कोणी मोमोस म्हटलं का तिकडे असं अफलातून कॅप्शन दिलं आहे. 

यावरुनच मोमोस खायला शिवानीला प्रचंड आवडतात असंच दिसतंय. 

 

‘इतक्या दिवसानंतर कॉल टाईमचा मेसेज बघून मला खूप आनंद झाला... मी स्वत: उत्सुक आहे पुन्हा एकदा संजुला भेटण्यासाठी तर प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा अंदाज मी लावूच शकते... आम्ही सगळेच आतुर आहोत प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी... आम्हाला खात्री आहे आमच्यावरचे तुमचे प्रेम असेच कायम राहील” - असं सांगत शिवानी सोनारने यापूर्वी मालिका पुन्हा सुरु होण्याचा  आनंद व्यक्त केला होता . 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive