By  
on  

काही जुन्या गोष्टी उगाच बदलल्या असं वाटतं कधीकधी..... : सुयश टिळक

जुनं ते सोनं असं म्हणतात, पण आज नव्याची कास धरताना जुन्या गोष्टींचा आपोआपच विसर पडतोय आणि त्यामुळे त्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत. पण जुन्याची सर नव्याला कधीच येणार नाही असं अनेकदा आपण आपल्या आई-आजी यांच्याकडून ऐकतो. अशाच एक अफलातून जुन्या वस्तूचा एक अप्रतिम व्हिडीओ अभिनेता सुयश टिळकने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

पूर्वीच्या काळी गावी लोक पाणी तापविण्यासाठी बंब वापरायचे. खाली कोळसे पेटवून या तांब्या-पितळीच्या बंबातलं गरमा-गरम पाणी आंघोळीसाठी मिळणं म्हणजे सुखच. याच आठवणींना सुयशने नुकताच उजाळा दिला आहे आणि खरच..याची सर गीझर आणि गॅसच्या पाण्याला नाही हेही तितकंच खरं. सुयश म्हणतो...बंब...काही जुन्या गोष्टी उगाच बदलल्या असं वाटतं कधीकधी.....

 

काय मग .. तुमच्यापैकी कोणी कोणी 'बंब' पाहिलाय...किंवा आजी-आजोबांकडून त्याबद्दल ऐकलंय...नसेल तर हा व्हिडीओ  नक्की पाहा. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive