By  
on  

‘अग्गबाई सासूबाई’च्या वर्षपुर्ती निमित्त निवेदिता सराफ यांनी शेअर केली खास पोस्ट

झी मराठीने आजवर अनेक वेगवेगळ्या विषयावरील मालिका चाहत्यांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यापैकीच एक आहे ‘अग्गबाई सासूबाई’ .वेगळ्या वळणावरच्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. आता या मालिकेने एक वर्षाचा टप्पा पार केला आहे. याची पार्टीही सेटवर नुकतीच साजरी झाली. या निमित्ताने आसावरी साकारणा-या निवेदिता यांनी एक खास मेसेज शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'अग्गबाई सासूबाई' ह्या आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं ह्या मालिकेला लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला अगदी अपेक्षेपेक्षा जास्त चांगला काही प्रमाणात टीका ही केली पण तरीही आसवरीवर खूप प्रेमही केलं. आसावरीची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आसावरीनं खूप काही शिकवलं पारितोषिकं दिली हे सगळं शक्य झालं ते आमच्या उत्कृष्ट टीममुळे मी Zee मराठी, निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सर्व सह कलाकार आणि तंत्रज्ञांची आणि प्रेक्षकांची खूप खूप आभारी आहे.

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf) on

 

आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्या म्हणतात, ‘'अग्गबाई सासूबाई' ह्या आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं ह्या मालिकेला लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला अगदी अपेक्षेपेक्षा जास्त चांगला काही प्रमाणात टीका ही केली पण तरीही आसवरीवर खूप प्रेमही केलं. आसावरीची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आसावरीनं खूप काही शिकवलं पारितोषिकं दिली हे सगळं शक्य झालं ते आमच्या उत्कृष्ट टीममुळे मी Zee मराठी, निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सर्व सह कलाकार आणि तंत्रज्ञांची आणि प्रेक्षकांची खूप खूप आभारी आहे.’  या मालिकेत आता नवीन वळण येऊ घातलंय. प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात ते लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive