By  
on  

स्वप्नील बांदोडकरच्या स्वरात सजलं "श्रावणमासी हर्षमानसी' , पाहा व्हिडीओ

 बालकवी यांची "श्रावणमासी हर्षमानसी" ही निसर्ग कविता सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकली आहे. मात्र आता श्रावण महिना सुरू झाल्याच्या निमित्ताने सागरिका म्युझिकने ही कविता नव्या रुपात, नव्या चालीत सादर केली आहे. गायक स्वप्नील बांदोडकरने नव्या रुपातलं "श्रावणमासी हर्षमानसी" हे गाणें गायलं आहे. नुकताच ह्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

सागरिका म्युझिकने स्वप्नील बांदोडकरचा "ती" हा नवा अल्बम सादर केला आहे. या अल्बममधील "कसा चंद्र" आणि "सौरी " ही गाणी यापूर्वीच लोकप्रिय झाली असून, त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ५ लाखाहून जास्त हिट्स मिळाले आहेत. नव्या रुपातल्या श्रावणमासीला निलेश  मोहरीरनं संगीत दिलं आहे, तर कलांगणच्या बालकलाकारांनी कोरस दिला आहे.

नीलेश मोहरीरचं फ्रेश संगीत आणि स्वप्नील बांदोडकरचा अप्रतिम आवाज यांच्या मिलाफातून नवं श्रावणनासी साकारलं आहे. या अप्रतिम गाण्याला देखण्या निसर्गाचीही जोड मिळाली आहे.

स्वप्नीलनं सागरिकाबरोबर केलेला "ती" हा पाचवा अल्बम असून याआधी "बेधूंद", "तू माझा किनारा", "तुला पाहिले " हे हिट अल्बम स्वप्नील आणि सागरिका यांनी रसिकांना दिले आहेत. त्यातील राधा ही बावरी, गालावर खळी, राधा राधा, मंद मंद अशी गाणी सुपरहिट झाली आहेत. त्यामुळेच आता नव्या रुपातलं "श्रावणमासी हर्षमानसी" हे गाणंही रसिकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive