By  
on  

शेतक-यांचा कैवारी बनून येतोय शिवा, "शिवा - एक युवा योद्धा चा ट्रेलर रिलीज

शेतक-यांना अनेक अ‍डचणींना सामोरं जावं लागतं. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटं शेतक-याच्या नशिबी असतात. पण शेतक-यांची या सगळ्यातून सुटका करण्यासाठी येत आहे शिवा - एक युवा योद्धा

शिवा - एक युवा योद्धा या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता सिद्धांत मोरे शिवाच्या भूमिकेत आहे. लेखक संजय मोरे यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे.

अॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं परीपूर्ण पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी ठरणार आहे. अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि कामराज ही कलाकार मंडळी सिनेमात दिसणार आहे. संगीत दिग्दर्शन  आदित्य बेडेकर यांचं आहे तर बाबासाहेब सौदागर हे या सिनेमाचे गीतकार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक विजय शिंदे आहेत. 'शिवा' सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=xTdqzBBqQUA

 

Recommended

PeepingMoon Exclusive