By  
on  

लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला उर्मिला कोठारेने दिल्या नृत्यमय शुभेच्छा

उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची नात जिजा नुकतीच एक वर्षांची झाली. यावेळी जिजाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन जोरदार झालं. जिजाचे आई आणि बाबा उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांनीदेखील जिजाचे पुरेपूर लाड पुरवले.

जिजाची आई उर्मिला कोठारे उत्तम कथ्थक नृत्यांगनादेखील आहे. त्यामुळे तिने जिजाला अत्यंत वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या नृत्याशा या कथ्थक अ‍ॅकॅडमीमध्ये नृत्याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. ‘हॅपी बर्थडे टू यू’ च्या धूनवर कथ्थक सादर करत उर्मिलाने लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्मिलाने या नृत्याचा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे.

https://www.facebook.com/urmillakothare/videos/227664034781266/

Recommended

PeepingMoon Exclusive