By  
on  

राज ठाकरे झाले मिताली बोरुडेचे सासरेबुवा, असा पार पडला अमित-मितालीचा विवाहसोहळा

सध्याच्या लग्नाच्या सीझनमध्ये आणखी एक हायप्रोफाईल लग्न नुकतंच पार पडलं. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा आज पार पडला.

ठाकरे कुटुंबात जवळपास २८ वर्षांनी हा विवाहसोहळा पार पडत असल्याने या सोहळ्याचा माध्यमांमध्येही बराच उत्साह दिसून येत होता.

अमित आणि मिताली यांच्या नात्याला दहा वर्षांहूनही अधिक काळ लोटला आहे. या नात्याला आता लग्नाच्या रुपाने नवीन ओळख मिळाली आहे.

या सोहळ्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाल कुर्ता, पायजमा आणि शाल असा पेहराव केला होता.अमितने फ्लोरल शेरवानी घातली होती. सुनबाई मितालीने केशरी तर शर्मिला ठाकरेंनी लाल रंगाची साडी नेसली होती.

या सोहळ्याच्या निमित्ताने जयदेव आणि उद्धव ठाकरेही खूप दिवसांनी एकत्र आले होते. या सोहळ्यात राजकिय पटलावरील महत्त्वाच्या व्यक्ती, सिनेक्षेत्रातील व्यक्ती तसेच इतर अनेक नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. अमित आणि मिताली यांनी उपस्थितांचे आशिर्वाद घेतले.

Recommended

PeepingMoon Exclusive