By  
on  

पाहा Video : स्वप्निल जोशीच्या लाडक्या राघव-मायराचं रक्षाबंधन सेलिब्रेशन

लहानपणापासूनचं भावंडांचं खास नटखट बॉण्डिग हळूहळू फुलत जातं ते मोठेपणी एकमेकांना समजून घेण्यापर्यंत, सुख-दु:खात खंबीरपणे पाठीशी उभं राहण्यापर्यंत. अभिनेता स्वप्निल जोशीने आपली लाडकी जोडगोळी म्हणजेच त्याची मुलं राघव आणि मायरा यांचा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारा हा क्युट व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. 

राघव आणि मायरा ही भावंड पिल्लू टीव्हीच्या माध्यमातून धम्माल दंगा करतात, हे तुम्ही पाहिलंच असेल. राघव -मायरा आज रक्षाबंधनाचं जोरदार सेलिब्रेशन करतायत, हे या व्हिडीओत पाहायला मिळतं. 

स्वप्निल जोशी हा व्हिडीओ पोस्ट करत म्हणतो, नातवंडं म्हणजे घरातील अनमोल कुंदन, त्यांच्या आनंदात असते आजी आजोबांचे स्पंदन
संस्कार जपत केले घरातील मोठ्यांना वंदन ...पिल्लू टीव्ही वर बघा मायरा राघवचे रक्षाबंधन "

 

आजी - आजोबांसोबत राघव आणि मायराने रक्षाबंधन साजरं केलं. आज्जीने दोघांनही ओवाळणी आणि रक्षाबंधनाचं महत्त्व पटवून दिलं तो क्षण खुपच गोड होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive