गायक, संगीतकार, लेखक आणि परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या रुपात समोर येत आहेत. त्यांच्या वेडिंगचा शिनेमा या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये लगीनघाई दिसत असून मामाच्या लग्नाला नक्की यायचं, जेवल्याशिवाय जायचं नाही हे बोल ऐकू येत आहेत.
दिग्दर्शक या नात्याने सलीलचा हा पहिलाच सिनेमा आहे. यशिवाय कथा, पटकथा, संवाद, संगीत याची जबाबदारी देखील सलीलने पार पाडली आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, सुनील बर्वे, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती घेरू आणि पीइएसबी यांनी केली आहे.
दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करण्यापूर्वी सलील यांनी कार्यपद्धतीचा अभ्यास केला. निखळ आणि हलकी फुलकी कथा असलेला हा सिनेमा १२ एप्रिल २०१९ ला प्रदर्शित होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=XEPSFa8mmsM