By  
on  

लकी बॉय अभय महाजनने सेलिब्रेट केला लकी गर्ल दिप्ती सतीचा वाढदिवस

दिप्ती सती आणि अभय महाजन हे एम-टाउनमधले नवे कपल आहेत. लकी-जियाची ही जोडी ब-याचदा ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही एकत्रच असते. 29 जानेवारीला दिप्तीचा वाढदिवस असतो. अभयने दिप्तीचा वाढदिवस खूप रोमँटिक पध्दतीने नुकताच साजरा केला.

सूत्रांच्या अनुसार, अभयने दिप्तीचा वाढदिवस ब्रिंग-इन करण्याचा परफेक्ट प्लॅन तिच्या आईसोबत मिळून आखला होता. दिप्तीच्या आईला सांगून तिला मुद्दामहून बाहेर घेऊन जायला लावलं. आणि तिथे अनपेक्षितपणे उपस्थित राहून तिला खूप छान रोमँटिक सरप्राइज दिलं. एम-टाउनच्या ह्या नव्या कपलमध्ये फुलणारी मैत्री सध्या चर्चेचा विषय आहे.

अभय महानला विचारल्यावर तो ह्याविषयी म्हणतो, “ती माझी लकी गर्ल आहे. त्यामूळे तिचा बर्थडे स्पेशल बनवायचा प्लॅन होता. दिप्तीला सरप्राइज दिल्यावर तिचा चेहरा अगदी लहान मुलासारखा फुलतो. मी तिला मुद्दामहूनच हा नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे सांगितलं होतं. तिला माझी उपस्थिती अजिबात अपेक्षित नव्हती.”

 

बर्थडे गर्ल दिप्ती म्हणते, “ मी खूप लकी आहे, की माझ्यावर एवढं प्रेम करणारी माणसं मला आयुष्यात मिळाली. रात्री 12 वाजता हातात फुलं घेऊन बर्थ डे विश करायला येण्याचं अभयच सरप्राइज मला खूप आवडलं. त्याला खूप रोमँटिक आइडिया सुचतात.”

 

Recommended

PeepingMoon Exclusive