अनुजा साठे आणि राकेश बापट हे दोघंही नव्या द्माचे आणि अभिनय संपन्न कलाकार म्हणून ओळखले जातात. या दोघांनीही हिंदी आणि मराठी क्षेत्रात स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आहे. असं असलं तरी मराठी सिनेमात दोघं एकत्र झळकण्याचा योग मात्र येत नव्हता. अनुजाने अलीकडेच परमाणु या सिनेमात काम केलं होतं. तर राकेशने सविता दामोदर परांजपेमधील अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
आता हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. व्हॉट्स अॅप लव्ह या सिनेमातून दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवता येणार आहे. हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकताच प्रदर्शित झालं आहे. सोशल मिडिया आणि नाती यांच्यातील गुंतागुंत आणि प्रेमाचे अलवार बंध यावर हा सिनेमा बेतलेला आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत बनवला जाणार आहे. हा सिनेमा ५ एप्रिलला रसिकांच्या भेटीला येत आहे.
https://www.instagram.com/p/BtNFe2Pg6VA/?utm_source=ig_web_copy_link