By  
on  

हेमांगी कवीच्या ‘त्या’पोस्टवर पुष्कर श्रोत्रीने केली कमेंट

सार्वजनिक असलेल्या वेस्टर्न टॉयलेटच्या अस्वच्छेबाबत अभिनेत्री हेमांगी कवीने  नुकतीच पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये तिने अनेकदा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी common toilets असतात. त्यावेळी पुरूष या वेस्टर्न टॉयलेटचा योग्य वापर करत नसल्यामुळे स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागतो असे म्हटलं होतं. हेमांगीच्या या पोस्टवर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने कमेंट केली. 

पुष्कर म्हणतो, ‘“शाब्बास हेमांगी, खूप महत्त्वाच्या विषयावर उत्तम भाष्य केलंयस तू! अरे, आम्हा पुरुषांना सुद्धा लोकांच्या असल्या घाणेरड्या आणि बेपर्वा वागण्याचा त्रास होत असतो, तर तुम्हा स्त्रियांना किती होत असेल! खरंच लोकांनी आपापल्या सामाजिक वागण्याचा (Socail Behavior)चा नीट विचार करावा, आपल्या वागण्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, ह्याची काळजी घ्यायलाच हवी!’
पुष्करसोबतच रवी जाधव आणि प्रिया बेर्डे यांनीही या पोस्टबाबत हेमांगी कवीचं कौतुक केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive