By  
on  

अवश्य पाहा भावनांचा संमिश्र कल्लोळ दाखवणारा डोंबिवली रिटर्नचा ट्रेलर

सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याचा भाग असलेली लोकलची वेळ सांभाळणं हा प्रत्येक मुंबईकरासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. डोंबिवली रिटर्नच्या ट्रेलरमध्येही अभिनेता संदीप कुलकर्णी लोकलच्या वेळा सांभाळत आयुष्यातील निवांत क्षण जगत असतो. पण हे करतानाच त्याच्या आयुष्यात काही बदल होतात. हे बदल पाहण्यासाठी मात्र २२ फेब्रुवारीला रिलीज होणारा सिनेमा डोंबिवली रिटर्न पहायला हवा. या सिनेमात संदीप यांनी केवळ अभिनयच केला नाही तर ते सिनेमाचे सहनिर्माते देखील आहेत. या सिनेमात राजेश्वरी सचदेव आणि संदीप कुलकर्णी यांची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. ट्रेलर पाहताना हा सिनेमा सायको-थ्रिलर असल्याचं लक्षात येतं. सिनेमात दिसत असलेल्या अनंत वेलणकरचं रहस्य लवकरच कळेल यात शंका नाही. संदीपसोबत या सिनेमाचे कपिल जव्हेरी, महेंद्र आटोळे, गुरुमीत सिंग हे सहनिर्माते आहेत. याशिवाय या सिनेमात हृषीकेश जोशी, अमोल पराशर आणि सिया पाटील यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

https://www.youtube.com/watch?v=a6HDffyUtPQ

Recommended

PeepingMoon Exclusive