भेदक डोळ्यांच्या शेवंताच्या तालावर नाचणार नाईकांचं कुटुंब, ही अभिनेत्री बनली आहे शेवंता

By  
on  

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवताना दिसत आहे. खरं तर हा भाग मूळ मालिकेचा सिक्वेल नसून प्रिक्वेल आहे. यात नाईकांच्या वाड्यातील पूर्वार्ध दाखवला जात आहे. आता या कथेत आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा प्रवेश होणार आहे. या मालिकेत आता सुशल्याची आई म्हणजेच शेवंताची एंन्ट्री होणार आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर शेवंताची भूमिका साकारणार आहे. तिने सोशल मिडियावरून ही बातमी शेअर केली आहे. यात एक व्हिडिओ आहे त्यामध्ये आण्णा नाईक तिला वहिनी म्हणून हाक मारताना दिसत आहेत. वहिनी म्हणून हाक मारणा-या अण्णाच्या मुलीची ती आई कशी होते हे आगामी काळात समजेलच.

शेवंताच्या येण्याने नाईकांच्या वाड्यातील गुढ प्रकरणांचा धसास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपूर्वाने आभास हा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अपूर्वाने यापूर्वी आराधना, आभास हा, तु जीवाला गुंतवावे, या मालिकेत काम केलं आहे. आता शेवंताच्या व्यक्तिरेखेतील अदाकारी लवकरच पाहावयास मिळेल.

https://www.instagram.com/p/BtNnsyfHy8X/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Loading...
Share