By  
on  

‘रेडीमिक्स’ सिनेमातील रोमॅंटिक गाण्याने पाडली नेटिझन्सना भुरळ

प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी या जोडीवर महाराष्ट्रातील रसिकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या जोडीच्या आगामी रेडीमिक्स सिनेमातील गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्यात वैभव आणि प्रार्थना रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. रेडीमिक्स या सिनेमात वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमेय विनोद खोपकर सादर करत असलेल्या या सिनेमात वैभव समीर नावाच्या मुलाची तर नेहा, सानिका आणि प्रार्थना नुपूर नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या तिघांच्यातील गैरसमजामुळे होणारे विनोद आणि त्यातच समीर आणि नुपुरचं फुलणारं प्रेम दिसत आहे. ‘का मन हे’ अशी सुरुवात असलेल्या या गीतावर आर्या आंबेकरने स्वरसाज चढवला आहे. यासोबत फरहाद भिवंडीवाला यानेही आर्याला साथ दिली आहे. गाण्याचे बोल अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत. संगीत अविनाश-विश्वजीत यांचं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जालिंदर कुंभार यांनी केलं आहे. प्रशांत घैसास आणि सुनील भोसले यांची निर्मिती आहे.   हा सिनेमा ८ फेब्रुवारी २०१९ ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=g7K1eZ8z9m8&feature=youtu.be

Recommended

PeepingMoon Exclusive