तुला पाहते रे या मालिकेत येणार नवं वळण, समोर येणार विक्रांतचं भयानक रुप

By  
on  

अनंत अडचणींनंतर ईशा आणि विक्रांत सरंजामे यांचं लग्न पार पडलं. लग्नानंतर त्यांचा गोड संसारही सुरु झाला. पण या संसाराला आता मिठाचा खडा पडणार आहे. याला कारण आहे खुद्द विक्रांत सरंजामे.
आजवर विक्रांतचं ईशावर खरं प्रेम आहे असंच चाहत्यांना वाटत होतं. पण विक्रांतने ईशाशी लग्न मनात कुटिल हेतू ठेवून केलं असल्याचं मालिकेच्या आगामी प्रोमोमधून दिसत आहे. झी मराठीच्या सोशल मिडिया माध्यमावर हा व्हिडिओ दिसत आहे. यात झेंडे विक्रांतला ईशाचं त्याच्यावर जीवापाड प्रेम असल्याचं सांगतो. पण विक्रांत मात्र या लग्नामागे असलेला कुटिल हेतू स्पष्ट करतो. आदर्श जावई, आदर्श नवरा, आदर्श मुलगा अशी प्रतिमा असलेल्या विक्रांतचं हे रुप पाहून चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. या एपिसोडमुळे मालिका नक्कीच मोठं वळण घेईल यात शंका नाही.

https://twitter.com/zeemarathi/status/1093053520658321408

Recommended

Loading...
Share