यंदा करोना संकटामुळे बाप्पाचं आगमन साधेपणाने झालं असलं तरी घरोघरी बाप्पाच्या सरबराईचा उत्साह मात्र कायम आहे. गणपती बाप्पाकडे प्रत्येकजण जगावर दाटलेले हे काळे ढग लवकर दूर होवोत अशी मनोभावे प्रार्थना करताना दिसत आहेत. सेलिब्रिटींनी त्यांच्या बाप्पाकडे असंच काहीसं मागणं असेल यात शंका नाही.