By  
on  

मराठी प्रेमाला दक्षिणेचा तडका, 'डोक्याला शॉट'चा ट्रेलर रिलीज

एखाद्याला विस्मरणाचा आजार असू शकतो किंवा एखादी बाब विसरण्याची सवय देखील असू शकते. पण एखादी व्यक्ती स्वत:चं लग्न विसरली तर! अशा वेळी उडणारी धमाल पहायची असेल तर डोक्याला शॉट सिनेमा पहायला लागेल. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ‘डोक्याला शॉट लागायला एक मिनिटही पुरेसा आहे’ अशी टॅग लाईन असलेल्या या सिनेमात एक लव्हस्टोरी दिसते. दाक्षिणात्य सुब्बुलक्ष्मी आणि मराठमोळा अभिजीत आठल्ये यांचं लग्न होणार असतं. पण लग्नाच्या काहीच दिवसांपूर्वी अभिजीतची मेमरी जाते. मग काय धमाल उडते ती सिनेमात पहायला मिळेल.

‘बालक पालक’ आणि ‘येल्लो’ सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’चा हा सिनेमा आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला हा सिनेमा शिवकुमार पार्थसारथी यांनी दिग्दर्शित केला आहे. सुमन साहू यांनी हा चित्रपट चित्रित केला आहे. सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओमकार गोवर्धन हे या सिनेमात आहेत. हा सिनेमा १ मार्चला रिलीज होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=SBi-TCFAOtY

Recommended

PeepingMoon Exclusive