By  
on  

दिग्दर्शकाच्या खडतर प्रवासातून प्रेक्षकांसमोर येतेय 'कॉलेज डायरी'

आपली ध्येय... आपली जिद्द... आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा दुर्दम्य आशावाद असतो तो स्वप्नांत. ही वेडी आशा आपल्याला पछाडून सोडते आणि मग सुरु होतो एक धाडसी प्रवास. अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकानेही असाच काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्यानिमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजनक्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी प्रत्येक कलावंत तळमळत असतो. अनिकेत ही त्यातलाच एक पण अंगीभूत गुण-कौशल्य आणि दुर्दम्य इचछाशक्तीने तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. स्वप्नांमागे धावताना पाय पोळले तरी चालतील पण स्वप्नं कवेत घेणारच असा निश्चयच जणू त्याने आपल्या गाठीशी बांधून ठेवलेला. 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्यानिमित्ताने त्याचं स्वप्नं तर प्रत्यक्षात साकारलं पण त्यामागील प्रवास प्रचंड कष्टप्रद आहे. दिग्दर्शनाची दोर हाती घेत सगळं युनिट सांभाळणं ही साधी गोष्ट नसून वेळोवेळी पदरमोड करीत या चित्रपटाला त्याने सांधलं. प्रसंगी आई-बहिणींचे दागिने गहाण ठेवत कधी व्याजावर पैसे घेत त्याने या चित्रपटासाठी निर्माते भावेश काशियानी यांनाही पाठिंबा दिला.

अचानकच काही निर्मात्यांनी बॅकआऊट केल्यावर दिग्दर्शक अनिकेतची जबाबदारी आणखी वाढली होती. एकाचवेळी चित्रपटाची धुरा तर दुसरीकडे चित्रपटासाठी फायनान्स मिळवणं अशी त्याची काहीशी कात्रीत सापडल्यासारखी अवस्थाच झाली होती म्हणा ना. अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अनिकेत न डळमळता आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत होता.

हे ही नसे थोडके की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रनिंग इक्विपमेन्टवर काम करीत असताना त्याच्या पाठीला दुखापत झाली जी पुढे जाऊन जीवघेणी ठरू शकली असती त्याचीही अनिकेत ने जराही पर्वा केली नाही विशेष म्हणजे त्याचा अजिबात बाऊ न करता शूटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. पाठीचं दुखणं सहन होई ना तरीही डॉक्टरांचा सक्तीचा बेडरेस्टचा सल्ला न जुमानता हा पठ्ठया पाठीवर स्प्रेचा वापर करीत आणि शूटवर जात असे. तब्ब्ल ३०० स्प्रे बॉटल्सचा वापर या दरम्यान त्याने केला जे केवळ सेटवरील अनिकेतच्या ३ मित्रांना माहित होतं. ध्येयवेड्या महत्त्वाकांक्षी अनिकेतला त्याचे स्वप्नं साकार करण्यापासून कुणीच अडवू शकत नव्हतं हे त्याने 'कॉलेज डायरी' चित्रपटाद्वारा सिद्ध केलंय. अडचणींचा डोंगर पार करत झालेला अनिकेतच प्रवास इथेच थांबत नाही तर आत्ता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून त्याच्या या प्रयत्नांना प्रेक्षकसुद्धा पसंतीची पावती देतील यात काही शंका नाही.

 

https://www.youtube.com/watch?v=RbljTS_BndU

'कॉलेज डायरी'ची कथा ही कॅम्पसमध्ये घडते. कॉलेज म्हणजे केवळ मजा-मस्ती-धम्माल असे मानणाऱ्या काही मित्रांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांभोवती फेर धरणारी अनिकेत जगन्नाथ घाडगे यांची कथा खिळवून ठेवणारी आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, शिवराज चव्हाण,शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'कॉलेज डायरी'ची थरारक गोष्ट उलगडण्यापूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. मराठी सिनेसंगीतक्षेत्रात नवा विक्रम करणारा 'कॉलेज डायरी' पाच भाषांतील गाण्यांमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाचही भाषांमधील सोशल पोर्टल्सवरील गाणी साऱ्यांच्याच ओठी रुळली आहेत.

https://youtu.be/3O5RM-QWPI0

१६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'कॉलेज डायरी'द्वारा दिग्दर्शक अनिकेत घाडगेचा सामान्य ते असामान्यपर्यंतचा लक्षवेधी प्रवास आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहावा असा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive