By  
on  

आता येणार ‘छत्रपती शासन’, उदयनराजेंच्या हस्ते पार पडला पोस्टर लाँच सोहळा

आजकाल जाती, धर्म आणि विषमतेचं विषारी बीज समाजात खोलवर रुजलं आहे. ते मुळापासून उखडून टाकायचं तर छत्रपतींच्या राज्यतंत्राची आजा समजाला नितांत गरज आहे. हेच ओळखून प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ''छत्रपती शासन'' सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा नुकताच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले आणि खुशाल म्हेत्रे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे यांनी केलं आहे याशिवाय कथा, संवाद देखील त्यांचेच आहेत.
सिनेमाच्या चित्रिकरणाचा शुभारंभ आपल्याकडे सेलिब्रिटींच्या हस्ते केला जाण्याची पद्धत आहे. पण या सिनेमाच्या निर्मात्यांनी ही पद्धत बदलली आहे. या सिनेमाचा शुभारंभ स्पॉट दादा योगेश मर्कड यांच्या हस्ते केला गेला. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्यात सामावून घेण्याचा शिवाजी महारांजाच्या वृत्तीचा वारसा इथे निर्मात्यांनी चालवल्याचं दिसून येतं. अभिनेता मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका असून सायली काळे, धनश्री यादव, किरण कोरे, सायली पराडकर, रामचंद्र धुमाळ, विष्णू केदार, राहूल बेलापूरकर, पराग शहा, प्रथमेश जोशी, श्रेयसचंद्र गायकवाड, अभय मिश्रा, मिलिंद जाधव यांचा अभिनय देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. नंदेश उमप, रोहित नागभिडे, सचिन अवघडे, अभिजित जाधव, राजन सरवदे यांनी या सिनेमाला संगीतसाज चढवला आहे. गायक नंदेश उमप, उर्मिला धनगर, जान्हवी प्रभू अरोरा, अभिजित जाधव, राजन सरवदे या गायकांनी सिनेमातील गाणी गायली आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive