सध्या मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण आज एकाच दिवशी नऊ मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. हा प्रकार मराठी सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असावा. या नऊ सिनेमांमध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई : व्यक्ती की वल्ली, जालिंदर कुंभार यांचा रेडीमिक्स, निलेश जळमकर यांचे दिग्दर्शन असलेला आसुड हा सिनेमादेखील आजच प्रदर्शित होतोय. तर व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असतानाच प्रेमवारी आणि प्रेमरंग हे दोन सिनेमेही ९ तारखेलाच रिलीज होत आहेत. याशिवाय पारधाड, दहावी, उनाड मस्ती हे सिनेमे देखील शुक्रवारी प्रदर्शित होत आहेत.
या गर्दीत संजय जाधव यांचा लकी या सिनेमा ६ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. अभय महाजन आणि दीप्ती सती ही फ्रेश जोडी या सिनेमातून भेटीला आली आहे. या नऊ सिनेमांना किती थिएटर मिळाली हे लवकरच कळेल.