By  
on  

सुव्रत जोशी म्हणतो,'तमिळ का? मी मराठी मुलीशी लग्न करीन'

हा फोटो पाहून आश्चर्यचकित झालात ना? अभिनेता सुव्रत जोशीने चक्क तमिळ मुलीशी लग्न केलेलं पाहून. पण ही कुठली तमिळ मुलगी नाहीय हे तुम्हाला माहितीय का, ही आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी. दोघंही आगामी 'डोक्याला शॉट' या धम्माल सिनेमात एकत्र झळकत आहेत आहेत. ह्याच सिनेमातला त्यांचा हा फोटो सध्या सोशल  मिडीयावर व्हायरल होत आहे.

'डोक्याला शॉट' या सिनेमात सुव्रत साकारत असलेलं पात्रं हे तमिळ मुलीशी लग्न करतो व ती तमिळ मुलगी प्राजक्ता माळी आहे. या सिनेमात दोघांचं पारंपारिक तमिळ पध्दतीने लग्नाचा सीन आहे. दोघंही त्यावेशभूषेत प्रचंड गोड दिसतायत. फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसून छान एन्जॉय करताना पाहायला मिळतायत.

सुव्रतने स्वत: हा फोटो शेअर करत म्हटलं आहे, 'तमिळ का? मी मराठी मुलीशी लग्न करीन, मी मराठी आहे. खुप मजा आली प्राजक्ता तुझ्यासोबत काम करताना. पण सिनेमात या सुुंदर मुलीशी माझं लग्न होतं का हे तुम्ही ओळखा आणि सांगा."

 

https://www.instagram.com/p/Btp6tZ2gdVT/

Author

Recommended

PeepingMoon Exclusive