मराठी सिनेसृष्टीतला प्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक नेहमीच सोशल मिडीयावर विविध पोस्टच्या माध्यामातून व्यक्त होतो. प्रसाद सारखीच त्याची पत्नी मंजिरी ओकसुध्दा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आज दोघांसाठी खुप खास दिवस आहे. त्यांचा मोठा मुलगा सार्थकचा आज 20 वा वाढदिवस असल्याने दोघांनी त्याला ह्या पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या सार्थक उच्च शिक्षणासाठी परदेशात असल्याने मंजिरी आणि प्रसाद ओक त्याला प्रचंड मिस करतायत. हे एक गोड चौकोनी कुटुंब आहे. नेहमीच खेळीमेळीचं वातावरण त्यांच्या घरी पाहायला मिळतं. प्रसाद ओकचा धाकटा मुलगा मयंक नुकताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
प्रसाद सारखाच मंजिरीनेसुध्दा सार्थकच्या बालपणीचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.