By  
on  

अमेय वाघने शिक्षक दिनाच्या दिल्या भन्नाट शुभेच्छा

आपल्या पालकांसोबतच आपल्यालाला घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. ते आपले गुरु असतात. मार्गदर्शक असतात.  प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. शिक्षक म्हणजे केवळ शाळा-महाविद्यालयातील शिक्षकच नव्हेत, तर जी व्यक्ती आपल्याला जीवनाच्या प्रवासात  काही ना काही शिकवून जाते, ती आपली शिक्षकच असते. अशा सर्व शिक्षकांचे आभार मानण्याचा हा दिवस. पण  हजरजबाबी आणि कल्पक विनोदबुध्दीसाठी प्रसिध्द असलेला  अभिनेता अमेय वाघने मात्र हटके लोकांना आजच्या शिक्षकदिनी शुभेच्छा दिल्या. 

Social Media वर लोकांना अक्कल “शिकवणा-या” सगळ्यांना शिक्षक दिनाच्या अमेयने  शुभेच्छा  दिल्या आहेत.  या सोबतच स्वत:चा एक स्टायलिश फोटोसुध्दा पोस्ट केला आहे. 

आजकाल सोशल मिडीयावर अनेकजण एकमेकांना शिकवतात, त्यांची अक्कल काढतात, आपलं ज्ञान पाझळतात, त्यांना अमेयने त्याच्या स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

 नेहमीच्या त्याच्या मिश्कील शैलीत अमेयने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याच्या या पोस्टवर नेटिझन्सनी आणि सेलिब्रिटींनी अनेक धम्माल कमेंट्स केल्या आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive