By  
on  

महेश मांजरेकरांनी मानसकन्या गौरीला या अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महेश मांजरेकर यांची मानसकन्या गौरी इंगवलेचा आज वाढदिवस आहे. यावेळी अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी गौरीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ एक उत्तम गुण असलेली मुलगी आजपासून 20 वर्षांपुर्वी जन्माला आली. आमच्या आयुष्यात तू 10 वर्षांपुर्वी आलीस आणि आयुष्य प्रकाशित केलंस.’

 

 

गौरी प्रत्येक पालकांना तुझ्यासारखी मुलगी हवी. तू तुझ्या गुणांनी दोन पालकांना खुश करणार आहेस. हॅपी बर्थ डे’.  गौरी ‘चक धुम धुम’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या समोर आली होती. आता ती महेश मांजरेकर यांच्या पांघरुण सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive