ईशा आहे का राजनंदिनीचा पुनर्जन्म, विक्रांत उलगडणार रहस्य

By  
on  

रोमॅंटिक कथेपासून सुरुवात झालेल्या तुला पाहते रे मालिकेने आता वेगळं वळण घेतलं आहे. ‘प्रेमाला वय नसतं’ अशा टॅगलाईनसह सुरुवात झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. विचारी, सालस आणि प्रेमळ विक्रांत सरंजामेची व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरली होती.

आता मात्र या मालिकेत प्रेमाची जागा कुटिलतेने घेतली आहे. सालस विक्रांतच रुपांतर लालची व्यक्तीमध्ये झालं आहे. लालची विक्रांत संपत्ती मिळवण्यासाठी ईशाच्या प्रेमाचा वापर करून घेत आहे.

https://www.instagram.com/p/BtvHIvuFo1-/?utm_source=ig_web_copy_link

यासाठी त्याचा नवा डाव आहे ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करणे. विक्रांतने त्यासाठी खेळी खेळायला सुरुवात देखील केली आहे. विक्रांत ईशा हीच गतजन्मातील राजनंदिनी आहे हे सिद्ध करू शकणार की नाही हे पुढील काही भागात समजेलच. त्यासाठी सोम ते शनि झी मराठीवर पाहा ‘तुला पाहते रे’ रात्री ८.३० वाजता

Recommended

Share