By  
on  

म्हणून प्राजक्ता माळी गातेय हे गाणं, सपनोंसे भरे नैना... ना नींद है ना चैना...

जुळून येती रेशीम गाठीची मेघना म्हणून ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. मराठी सिनेसृष्टीतील ही गोड अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. विविध पोस्टच्या माध्यमांतून तिला चाहत्यांसोबत संवाद साधायला आवडतो. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बहारदार सूत्रसंचलनाने सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम रंगत जातोय. पण त्याचसोबत या कार्यक्रमातील तिच्या विविध गेट-अपची चर्चाही रंगते. 

 

 

 प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या लेटेस्ट भागांतील आपले साडी लुक्समधले विविध फोटो शेअर केले आहेत. ह्यात नेहमीप्रमाणे ती अप्रतिमच दिसतेय. 

 

  सपनोंसे भरे नैना... ना नींद है ना चैना...या प्रसिध्द गाण्यांच्या ओळी लिहून प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केली आहे. 

 

लाईट बेबी पिंक कलरच्या या बॉर्डरला कशिदा काम केलेल्या सुरेख साडीत प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

प्राजक्ताचे हे सर्वच फोटो एक नंबर आहेत, त्यामुळे साहजिकच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive