By  
on  

बाईकच्या क्रिएटिव्हिटीमुळे देवा भाईला मिळाला हा सुरेख टॅटू

डॉक्टर डॉन मालिकेतील देवा भाई आणि डॉली बाईंची लव्ह-हेट स्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरतेय. या खट्टी-मिठी जोडीची ही नोक-झोक पाहण्याची नेहमीच उत्सुकता असते. मालिकेतला देवा भाई  प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सध्या बाईकिंगचा आनंद लुटतोय. 

देवा भाई फेम प्रसिध्द अभिनेता देवदत्त नागे सोशल मिडीयावर चांगलाच एक्टीव्ह असतो. त्याचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. देवदत्तला अभिनयाप्रमाणेच फिटनेसची आणि त्याचबरोबर बाईक राईडची खुप जास्त आवड आहे. अनेकदा त्याचं हे बाईकप्रेम सोशल मिडीयावर पाहायला मिळतं. 

 

 

अलिकडेच बाईक राईडची मजा लुटताना त्याच्या टीशर्टवर आपसूकच चिखलाचा असा टॅटू त्याला मिळाला. त्याचे हे भन्नाट फोटो देवदत्तने शेअर केले आहेत. आपल्या बाईकच्या क्रिएटिव्हीटीमुळे आपल्याला हा सुरेख टॅटू मिळाल्याचं तो कॅप्शनमध्ये सांगतोय. 

 

 

देवदत्तच्या या भन्नाट पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.  जय मल्हार मालिकेतील खंडेराय म्हणून देवदत्त महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रसिध्द आहे. त्यानंतर त्याच्या अभिनयाची चुणूक बॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा तानाजी- द अनसंग वॉरियरमधूनही पाहायला मिळाली. 

आता देवा भाई बनून तो रसिकांचं धम्माल मनोरंजन करताना पाहायला मिळतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive