By  
on  

शंतून मोघे दिसणार शहाजी महाराजांच्या भूमिकेत, प्रिया मराठे-मोघेने असं केलं कौतुक

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.  या मालिकेत आता एक रंजक वळण येताना दिसत आहे. या मालिकेत आता एक रंजक वळण येणार आहे. यावेळी मालिकेत अनेक बदल होतानाही दिसणार आहे. या मालिकेत आता जिजाऊंची भूमिका भार्गवी चिरमुले साकारत आहे. तर या मालिकेत दादोजी कोंडदेवांच्या व्यक्तिरेखेत डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहेत. कणखर जिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी तर त्यागी पित्याच्या भूमिकेत म्हणजेच शहाजी राजांच्या भूमिकेत शंतून मोघे दिसणार आहेत.

 

 

अभिनेत्री आणि पत्नी प्रिया मोघेने यावेळी कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये प्रिया म्हणते, ‘ह्या उतुंग व्यक्तीमत्वालाही तू न्याय देशील ह्यात काही शंका नाही.. आतुरतेने वाट बघतोय.. खूप खूप शुभेच्छा.. @shantanusmoghe "शहाजी महाराज" यांच्या रुपात "स्वराज्य जननी जिजामाता" ह्या मालिकेत’  शंतनू यांनी यापुर्वी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive