By  
on  

आशाताईंच्या स्वरेल सुरांनी सजली 'आईची आरती', प्रसाद ओकने दिला आठवणींना उजाळा

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेल्या आणि त्याला भेटण्यासाठी कडा उतरुन जाणा-या आईची शौर्यगाथा हिरकणी सिनेमात पाहायला मिळाली. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना प्रचंड भावला. 

पण 'हिरकणी' सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे  स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या  सुरेल स्वरांनी यातील आईची आरती सजली आहे. आशा भोसले हे गाणं गात असताना एका क्षणाला स्टुडिओत आशा भोसलेंसह सर्वांचेच डोळे पाणावले होते. . लोकप्रिय कवी संदीप खरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

 

आज आशाताईंचा 87 वा वाढिवस. त्यानिमित्ताने 'हिरकणी' सिनेमाच्या या आठवणींना उजाळा देत आशाताईंना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच प्रसाद ओकसोबत या फोटोत  पत्नी मंजिरी ओकसुध्दा दिसतेय. 

 

 

आशाताईंच्या स्वरात सजलेल्या आईच्या आरतीने प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive