By  
on  

आनंद शिंदे म्हणताहेत 'आली फुलवाली'

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी चेतन गरुड प्रॉडक्शन्सची दिलखेच गाणी सध्या आबाल-वृद्धांच्याही ओठी रुळली आहेत. 'खंडेराया झाली माझी दैना' आणि 'सुरमई'ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चेतन गरुड आणखी एक हिट गाणं रसिक-प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेंनी आपल्या हटके अंदाजात गायलेल्या 'आली फुलवाली' या अल्बमलासुद्धा तरुणांनी डोक्यावर नाही घेतलं तरच नवल!

चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्तविद्यमाने 'आली फुलवली' हा सिंगल अल्बम वाजवा मराठी या युट्युब चॅनलवर झळकणार असून लवकरच हे गाणं इतर सोशल पोर्टल्सवर आणि म्युझिक चॅनेल्सवर तुम्हाला पाहता येईल.

पिंपळगाव हरेश्वर या छोट्याशा गावातील चेतन रवींद्र गरुड या तरुणाने 2018 मध्ये मराठी सिंगल अल्बममध्ये 'खंडेराया झाली माझी दैना' हे सर्वात लोकप्रिय गाणं मराठी प्रेक्षकांना दिलं जे सर्वत्र जोरदार वाजलं आणि गाजलं देखील. आत्ता प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून त्यांनी आपलं तिसरगाणं २०१९ च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट यांचं तिसरं गाणं 'आली फुलवाली' 9 फेब्रुवारीला रिलीज झालं आहे.

चेतन मोहतुरे आणि अस्मिता सुर्वे या नवोदित जोडीवर चित्रित केलेलं हे गाणं शप्पिद शेख यांनी लिहिले व संगीतबद्ध केले आहे. राहुल झेंडे दिगदर्शित 'आली फुलवाली' या अल्बमच्या टायटलवरूनच आपल्या लक्षात येईल हे गाणं एका फुलवालीला उद्देशून लिहिले गेलेले असून त्यातली कलरफुल फुलवाली सगळ्यांची मनं जिंकेल यात शंका नाही.

या गाण्याच्या मागणीनुसार त्यासाठी सेटही तसाच फ्रेश ठेवण्यात आला, ज्याचे कला दिग्दर्शन हिना एस.के. यांनी सांभाळलं आहे. चेतन महाजन (नानू) आणि रोहन राणे यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली जमून आलेला 'आली फुलवाली'चा फक्कड ठेका ताल धरायला लावेल. अल्बमला साजेशी वेशभूषा रश्मी मोखळकर यांची आहे तर या अल्बमचे संकलन राहुल झेंडे यांनी केले आहे शिवाय रवी उच्चे यांचे उत्कृष्ट छायांकन 'आली फुलवाली'ला लाभले आहे.

 

https://youtu.be/cjqMeo7v5ik

तरुणाईच्या हृदयाला भिडणा-या  चेतन गरुड यांच्या सिंगल अल्बम्सचा नवा फंडा अनुभवायला 'आली फुलवाली' हा नवा-कोरा अल्बम नक्की ऐका.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive