रात्रीस खेळ चाले मालिकेचं असं असतं शुटिंग, कलाकारांनी शेअर केला अनुभव

By  
on  

मराठी मालिकांच्या यादीत भयपटांची संख्या कमीच आहे. त्यातही ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अग्रस्थानी आहे. या मालिकेच्या पहिल्या भागालाही रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता या मालिकेचा प्रीक्वेल सुरु आहे. या मालिकेत आण्णाच्या आयुष्यातील घटना दाखवल्या जात आहेत. नाईकांच्या वाड्यातील रहस्यांचं मुळ या भागात दडलेलं असल्याची शंका नाकारता येत नाही. आता या मालिकेत शेवंताचा शिरकाव झाला आहे. शेवंता ही सुशल्याची आई आहे. शेवंता आणि आण्णाच्या नातेसंबंधामुळे नाईकांच्या वाड्यातील वातावरणही कलुषित झालं आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1095173326505369600

या मालिकेचं मेकिंग नुकतंच सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. या मेकिंगमध्ये मालिकेतील कलाकार रसिकांचे आभार मानताना दिसत आहेत. या मालिकेचा युएसपी त्याचं कॅमेरावर्क आहे. त्याचं पार्श्वसंगीत हे देखील मालिकेच्या प्रभावात भर घालते. एकुणच काय ही मालिका रसिकांना घाबरवण्यास यशस्वी ठरली आहे.

 

Recommended

Loading...
Share