By  
on  

तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई लवकरच या सिनेमासाठी एकत्र

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई ही सिनेसृष्टीतील जोडी लवकरच एका आगामी सिनेमासाठी एकत्र येत आहे. 'जजमेंट' असं या आगामी मराठी सिनेमाचं नाव आहे. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या  कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

समीर सुर्वे यांनी यापूर्वी व. पु. काळे यांच्या 'पार्टनर' या कादंबरीवर आधारित 'श्री पार्टनर' आणि 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे 'जजमेंट' सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी या 'जजमेंट' सिनेमाची निर्मिती केली आहे. 'जजमेंट'च्या गाण्याचे गीतकार मंदार चोळकर असून संगीतकार नवल शास्त्री आहेत. या सिनेमात 'श्री पार्टनर' फेम श्वेता पगार , हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये ,महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा देशमुख आणि नुमायारा खान आदी कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive